खेडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

खेड : येथील नगरपालिकेने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पाचशे रुपये दंड भरण्याची कारवाई केली. नगरपालिकेच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या भरारी पथकाने नऊ जणांवर ही कारवाई करत साडेचार हजार रुपये दंड वसूल केला. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रमुख मनोज शिरगावकर, सहायक परशुराम पाथरे, उमा गुजराथी, स्मिता गुहागरकर, सुनील खातू यांनी ही कारवाई केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:13 PM 09-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here