रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून गेल्या चौवीस तासात एकूण ८७ मिमी तर सरासरी ९.६७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात १५ मिमी तर सर्वात कमी पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात ४ मिमी झाली तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे असून आकडे मिलीमीटर मध्ये आहेत. मंडणगड १० मिमी, दापोली १३ मिमी, खेड १२ मिमी, गुहागर ८ मिमी, चिपळूण १२ मिमी, संगमेश्वर ८ मिमी, रत्नागिरी ४ मिमी, लांजा ५ मिमी आणि राजापूर तालुक्यात १५ मिमी पाऊस झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे १३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० वाजता प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार खेड तालुक्यात मौजे देवघर येथे संगीता हणमंत मोरे यांच्या घराचे पावसामुळे अंशतः २ हजार ५०० रुपयांचे नुकसान, सोनस खु. येथील तुकाराम रा. जाधव यांच्या घराचे पावसामुळे अंशतः १८ हजार रुपयांचे नुकसान, सुदाम विठ्ठल तांबे यांच्या घराचे पावसामुळे अंशतः ७ हजार रुपयांचे नुकसान, मोहल्ला शफी कासम यांच्या घराचे पावसामुळे अंशतः ८ हजार रुपयांचे नुकसान, गोतवली येथील समाज मंदीराचे पावसामुळे अंशतः २ लाख ११ हजार रुपयांचे नुकसान, बोरघर येथील जि.प. विभागाच्या विहिरीचे पावसामुळे अंशतः नुकसान, सुलोचना गणपत जाधव यांच्या घराचे पावसामुळे अंशतः ८ हजार ६०० रुपयांचे नुकसान, विद्या विठ्ठल शेडगे यांच्या शौचालयाचे पावसामुळे अंशतः २८ हजार ५०० रुपयांचे नुकसान, झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
