वादळाने दापोलीतील विहिरींचे पाणी दुषित

दापोली : निसर्ग वादळाने दापोलीत मोठ्या प्रमाणात हानी झाली असून अनेक समस्याचा सामना येथील लोकांना करावा लागत आहे. त्यात विहिरींचे पाणी दूषित झाल्याने तालुक्यात रोगराई पसरण्याचा धोका संभवत असून साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीत केळशी, आडे, पाज, हर्णे, दाभोळ, पाडले आदी भागातील लोक निवारा दुरुस्त करण्याच्या धडपडीत आहेत. त्यात विहिरीचे पाणी दूषित झाल्याने लोकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असून वादळानंतर आणखी नवे संकट या नुकसानग्रस्त भागात उभे राहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here