लांजात वादळाने २ लाख ३० हजारांचे नुकसान

लांजा : कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे लांजा तालुक्यालाही चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातील २१ घरे व १ गोठ्याचे असे २ लाख ३० हजार ६६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसुल विभागाने केले असून हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका तालुक्यात सर्वत्र बसला आहे. यामध्ये पश्चिम भागाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. यामध्ये साटवलीतालयवाडी, सापुचेतळे, रुण, हर्चे, खानवली, पुनस, वेरळ, मठ, आसोडे, निवसर तर पूर्व भागातील देवधे, वेरळ,लांजा, कुवे, गोळवशी यासह कोचरी, हर्दखळे, शिपोशी या गावांना बसला आहे. यामध्ये तालुक्यातील एकूण २१ घरांसह १ गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. यामध्ये लांजा तालुक्याचे २ लाख ३० हजार ६६५ रुपयांचे नुकसान झाले.वादळाने घरांचे पत्रे उडाले तर काही घरांवर व गोठ्यावर झाडे पडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही गावांमध्ये किरकोळ नुकसानीच्याही घटना घडल्या आहेत. चक्रीवादळामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. तालुक्यात कुठेही जीवित हानी झालेली नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:28 PM 11-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here