बेदरकारपणे बोलेरो चालवत दोन पादचारी महिलांना उडविले; उपचारांदरम्यान एकीचा मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील मांडकी भटवाडी येथे भरधाव बोलेरो पीकअप गाडी चालवून दोन पादचारी महिलांना उडविले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रशाली चंद्रशेखर पणिंद्रे या महिलेचे उपचारादरम्यान गुरुवारी निधन झाले आहे. याबाबत रमेश गोविंद जानवलकर (सहाय्यक पोलिस फौजदार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हा अपघात ९ जून रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी गणेश अशोक पवार (२७, रा. वहाळफाटा) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश पवार हा आपल्या ताब्यातील बोलेरो पीकअप गाडी घेऊन पालवण ते सावर्डा असा जात असताना गाडी बेदरकारपणे चालवित होता. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मांडकी भटवाडी मोरीजवळ गाडी आली असता रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत जाणाऱ्या दोन महिलांना या गाडीने विरुद्ध बाजूला जाऊन समोरून धडक दिली व गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. यामध्ये चालत जाणाऱ्या प्रशाली चंद्रशेखर पणिंद्रे व रूपाली रूपेश खैर (रा. मांडकी) या दोन महिला जखमी झाल्या. त्यातील प्रशाली चंद्रशेखर पणिंदे या महिलेचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:45 AM 12-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here