मातेवर अत्याचार करणारा नराधम ताब्यात

राजापूर : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना राजापूर तालुक्यातील साखर गावात घडली आहे. एका ३८ वर्षीय मुलाने दारूच्या नशेत जन्मदात्री वृद्धा आईवरच अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोबारा केलेल्या या तरुणाला गावातील लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी या वृद्ध मातेने नाटे पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ३८ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत स्वत:च्या ७० वर्षाच्या मातेसोबतच पवित्र नात्याला कलंक लागेल असे कृत्य केले. या घटनेने साखर गाव हादरला असून दारूची नशा उतरताच सकाळी घरातून बाहेर पडून गेलेल्या युवकाला गावातील काही लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची खबर मिळताच नाटे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणी नाटे पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:18 PM 13-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here