खारेपाटनच्या पुरात मोलाची कामगिरी करणा-या युवकांचा ७३ व्या स्वातंत्रदिनी जाहिर सत्कार

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणमध्ये पुराच्या पाण्यात जैन वाडी येथे अडकलेले पवन कावळे आणि कुटूंबातील पाच सदस्य वरच्या मजल्यावर अडकून राहिले होते. त्यात ३ वर्षे व ९ वर्ष लहान मुलांचा समावेश होता. चारही बाजूने पाण्याने वेढा दिल्याने भयान अवस्था झाली होती. या वेळी कणकवली तहसीलदार आर जे पवार, कनकवलीचे विद्यमान नगर सेवक अबी मुसळे यांनी जैतापूर मध्ये संपर्क साधत महसूल खात्याच्या अधिकार्यांनी रेस्क्यु ऑफरेशन राबवून बोटीच्या सहाय्याने कुटुंबाला बाहेर काढले होते. या कामी जैतापूर आपतकालीन व्यवस्थापनेचे जैतापूर चे कार्यकर्ते पत्रकार सचिन नरेंद्र नारकर, शिरीष यशवंत पंगेरकर, किशोर राजाराम पंगेरकर, आशिष अशोक पाटील, कालिदास मारुती पंगेरकर, अक्षय कालिदास पंगेरकर, श्रेयस योगेश पडवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. या धाडसी व यशस्वी कामा बद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालूका दंडाअधिकारी कार्यालयाच्या पटांगणात ७३ व्या स्वातंत्रदिनाच्या वेळी विविध्द मान्यवरांच्या उपस्थितीत शासना मार्फत जाहिर सत्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here