नोकरीचे आमिष दाखवून सव्वा दोन लाखांची फसवणूक

रत्नागिरी : बांधकाम खात्यात नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून तरुणाची सुमारे २ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ एप्रिल २०१९ ते ३ मे २०२० या कालावधीत मिरजोळे येथे घडली आहे. प्रगती पाटील (रा. मिरजोळे, रत्नागिरी), पाथरे, रायकर, विलणकर (रा.खडपेवठार,रत्नागिरी), कुणाल बारगडे आणि हनिफ झारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ६ जणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मोहित मारुती नार्वेकर (२४, रा.काजरघाटी,रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार या ६ जणांनी संगनमताने कुणाल बारगुडे आणि हनिफ झारी या दोघांच्या खात्यात मोहितला गुगल पेव्दारे पैसे टाकण्यास सांगून २ एप्रिल २०१९ ते ३ मे २०२० या कालावधीत त्याच्याकडून एकूण २ लाख २९ हजार रुपये उकळले. मात्र, नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहितने पोलिसांकडे तक्रार दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:42 PM 15-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here