सुशांतसिंह राजपूतवर आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांना आणि त्याला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने आत्महत्या केली यावर विश्वास बसत नाही. आत्महत्येनंतर त्याचा मृतदेश शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सुशांतचे कुटुंबिय मुंबईत दाखल झाले असून आज सोमवारी मुंबईतच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं होतं. याशिवाय पोलिसांनाही सुशांतच्या घरात डिप्रेशनवर सुरू असलेल्या ट्रीटमेन्टची फाइल मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here