चिपळूण : खास प्रतिनिधी
तिवरे धरण दुर्घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी येथील ग्रामस्थांचा तात्पुरत्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. शासन आता या लोेकांना ‘कंटेनर होम’मध्ये स्थलांतरित करण्याचा विचार करीत आहे. मात्र, तोपर्यंत सुमारे 40 ग्रामस्थ तिवरे भेंदवाडी येथील सुस्थितीत असलेल्या तीन घरांमध्ये वास्तव्य करीत आहेत. येथील लोकांशी संपर्क साधला असता, धरण दुर्घटनेला जबाबदार असणार्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे असा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला. येथील तानाजी चव्हाण यांनी हा विषय संपलेला नाही. अजून अनेक विषय बाहेर येणार आहेत, असे स्पष्ट केले.