पूरपरिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी : सुनील तटकरे

0

रत्नागिरी – पूर परिस्थितीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर येथील अनेक गावे उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे पूरस्थितीतून या गावांना सावरण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. मात्र, मागितलेली ६ हजार कोटींची मदत अपुरी असून, ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पुर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे.

पुरामुळे बहुतेक घरे, शेती उद्ध्वस्त झाली आहे. असे असताना 6800 कोटींमध्ये कसे भागणार? असा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला आहे. या सरकारने अशा परिस्थितीत प्रदीर्घ अनुभव असलेले नेते शरद पवार यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे, असा सल्लाही तटकरे सरकारला दिला आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना १९८९ सालात आलेल्या पुरावेळी त्यांनी सतत दौरा केला. देशाच्या पंतप्रधानांना त्यावेळी पुर परिस्थितीची पहाणी करण्यासाठी राज्यात आणले. यावेळी झालेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुले कुठल्या बेरजा मारून सरकारने मदत मागितली, याचा अंदाज मला नाही, असे तटकरे म्हणाले. दरम्यान पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, हे सरकार पूरग्रस्तांची चेष्टा करण्यात गुंग आहे. या सरकारला परिस्थितीचे गांभीर्यच नसून महाजन यांच्या सेल्फीचं समर्थन हे अयोग्यच असल्याची, टीका तटकरे यांनी केली आहे.कोकणातील भातशेती पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे कोकणाला भरीव मदत मिळाली पाहिजे. तसेच शेतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here