स्वाभिमान पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0

रत्नागिरी : मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा दुरुस्ती कामाला सप्टेंबर २०१८ पासून कंत्राटदार नेमलेला असूनही केवळ पत्तन अभियंता कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे हे काम रखडले आहे. याचा फटका स्थानिकांना बसत असून मोठ्या प्रमाणावर नुकसानदेखील होत आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने जिलाधिकारी सुनील चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. १ कोटी ९२ लाख रुपयांची निविदा कंत्राटदार अर्जुन अर्थमुव्हर्स या कंपनीला देण्यात आली होती. असे असताना उन्हाळी काळात या ठेकेदाराने काम केले नाही किंवा काम निविदेबरहुकुन करुन घेण्यास रत्नागिरी पत्तन विभागाने स्वारस्य दाखविलेले नसल्याचे स्वाभिमान पक्षाचे म्हणणे आहे. अमावस्येला आलेल्या उधाणाने बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. निविदा प्रक्रियेला सप्टेंबर २०१९ रोजी वर्ष पूर्ण होईल. तरीही काम पर्ततेसाठी संबधित कार्यालयाला महतं मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थ या कामात ढवळाढवळ नको असे सुरुवातीपासूनच सांगत होते तरीदेखील स्थानिक साम्राजाच्या दबावापोटी हे काम ज्यांना हवे होते त्यांना न मिळाल्याने या कामाची दिरंगाई झाली असावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नेमलेले काम नेमलेल्या कंत्राटदाराकडून करून घेणे हे ज्यांचे काम होते त्या कार्यालयाच्या बेपर्वाईला जबाबदार कोण? निव्वळ निविदा काढून कंत्राटदार नेमला यावर स्थानिक रहिवाशांनी आनंद मानायचा काय? असेही विचारण्यात आले आहे. या प्रश्नांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वाभिमानच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला टेट्रापॉड टाकण्यात येतील. लोकांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यानंतर अंतर्गत रस्ते करण्यात येतील. यावेळी पावसाच्या हंगामात सिमेंट वापरुन बनविण्यात येणाऱ्या टेट्रॉपॉडचे काम करणे अशक्य आहे. आजवरच्या कामाचे स्वरुप लक्षात घेता एवढ्या मोठ्या रकमेची निविदा निघुनही सदरचे काम करण्यास आवश्यक यंत्रसामुग्री नेमलेल्या ठेकेदाराकडे नाही असे स्वाभिमानच्या वतीने सांगण्यात आले. संबंधित काम अग्रक्रमाने करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी बोलतांना दिली. शेवटी मिऱ्या येथील वाडी, वस्ती, घरे आणि वषानुवर्षे राहणाऱ्या स्थानिक जनतेच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा स्वाभिमानच्या वतीने या निवेदनाआधारे देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, महिला तालुकाध्यक्ष सी. पी लाकडे यासह उपाध्यक्ष ययाती शिवलकर, तालुका उपाध्यक्ष गुरु चव्हाण, शहर अध्यक्षा संकेत चवंडे, समीर तांडेल, स्वानंद शिवलकर आदि स्वाभिमानचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here