‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

रत्नागिरी : डायलेसीससाठी आलेल्या सासऱ्यांना कोरोना झाल्यानंतर जावयासह मुलगी व नातवंडांना क्वारंटाईन व्हायची वेळ आली. या सर्वांची कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. १२ जून रोजी मुंबईहून शिरगाव येथील आपल्या जावयाकडे एक वृद्ध आले होते. त्यांना रत्नागिरीत डायलेसीस करायचे होते त्यासाठी ते आले होते. मात्र खाजगी रुग्णालयात आधी कोरोनाची टेस्ट करा असे सांगितल्यानंतर त्यांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले आणि जावयाच्या घरी निघून गेले. १३ जून रोजी रात्री उशीरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच धावाधाव सुरु झाली. रात्री २ वाजता त्यांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले. त्या पाठोपाठ जावई, मुलगी आणि २ नातवंडे यांना देखील हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून आरोग्य विभागाने ताब्यात घेतले होते. त्या ६५ वर्षीय वृद्धाला आयसोलेशन कक्षात दाखल केल्यानंतर जावई, मुलगी व २ नातवंडांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शिरगाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:39 AM 16-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here