चिपळूणच्या ‘अपरान्त’ हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार

चिपळूण : चिपळूण येथील अपरान्त हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहेत. १ सप्टेंबरपर्यंत या सवलतीचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला घेता येणार आहे. कोविड-१९ रिलीफ योजना रुग्णालयाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला खासगी स्तरावरील रुग्णालयात शुल्क भरून उपचार परवडणार नाहीत. याबाबत अपरान्त हॉस्पिटल प्रशासनाने केवळ सेवा शुल्क सवलत पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून ओपीडी उपचारांवर २० टक्के सवलत दिली जाणार आहे. कोरोना संकटात अपरान्त हॉस्पिटलने नियमित शासकीय नियमांची कास धरली आहे. अद्ययावत आरोग्य सुविधा असलेल्या या रुग्णालयात या सवलतीमुळे ग्रामीण भागातील जनतेला लाभ मिळणार आहे. दि. १ सप्टेंबर २०२० पर्यंत जनतेला बाह्यरुग्ण विभागात ही सवलत मिळणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:16 PM 16-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here