रत्नागिरी समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकेला जलसमाधी

0

रत्नागिरी : राजीवडा परिसरातील फणसोपकर यांची अलीना नामक मासेमारी नौका रत्नदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात मासेमारी करत असताना बुडाली. ही घटना आज  पहाटे ४ वाजता घडली. काल सायंकाळी ही नौका मासेमारी साठी समुद्रात गेली होती. या नौकेवर ६ खलाशी होते. त्यापैकी ५ खलाशी वाचले असून तिघे जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सोमेश्वर येथील पवार नामक खलाशी अद्याप सापडलेला नाही. किल्ल्यासमोर ८ फॅदम (वाव) खोल समुद्रात जाळे टाकलेले असताना पाण्याच्या तीव्र प्रवाहाने नौका किल्ला किनारी वाहून आली. योग्य वेळी नौकेचे इंजिन सुरू न झाल्याने ही घटना घडली. वेळेत इंजिन सुरू न झाल्याने नौकेने हेलखावे खात दगडावर आपटली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here