रत्नागिरी : समृध्द कोकण संघटना अॅडव्हान्टेज कोकण परिषद आणि कोकणभूमी प्रतिष्ठान यांच्यावतीने ‘कोकणातील गुंतवणुकीच्या व व्यवसायाच्या भविष्यातील संधी’ या विषयावर दि. २६ ऑगस्ट २०१९ रोजी सायं ७.०० ते १०.०० वा. वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई येथे होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, शिवाजीराव दौंड, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोकण आयडॉल पुरस्कार सोहळा होणार आहे. कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासातून कोकण विकास या अंतर्गत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये एन. पी. टी, दिघी, जयगड आदी बंदरांचा विकास व रोजगार संधी या विषयावर हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरभाई धारिया, पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरी मुंबई, महामुंबई, उत्तर रायगडचा विकास व रोजगार संधी या विषयावर चीफप्लॅनर, सिडकोचे दिनकर सामंत, कोकणातील भविष्यातील पर्यटन विकास व रोजगार संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय पर्यटन तज्ञ संजय दाबके मार्गदर्शन करणार आहेत. कोकणातील भविष्यातील विकासाच्या व गुंतवणुकीच्या संधी या विषयावर सेंट अँजेलोचे अध्यक्ष राजेश अथायडे, मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ चौपदरीकरण, अलिबाग ते वेंगुर्ला,सागरी महामार्ग व कोकणातील रस्ते विकास, मत्स्योद्योग विकास, मत्स्यशेती, मत्स्यप्रक्रिया व रोजगार संधी आणि आधुनिक शेती, फळप्रक्रिया, फलोद्यान व रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर कोकणातील विविध क्षेत्रातील विकासाच्या संधी अंतर्गत सिंधुदूर्ग पर्यटन जिल्हा व पर्यटनातन रोजगार यामध्ये व्हेनामी कोळंबी पालन यावर काशिनाथ तारी, मत्स्य तज्ञ बोलणार आहेत तर हॉस्पिटॅलिटी उद्योग या विषयावर संतोष कांदळगावकर हे हॉस्पिटॅलिटी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन कोकणभमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव आणि कार्याध्यक्ष किशोरभाई धारिया यांनी केले आहे.
