ना. उदय सामंत आजपासून रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दि. १८ जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दि. १८ रोजी संगमेश्वर तालुकास्तरीय आढावा बैठक, कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भात आढावा, मतदारसंघातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांच्यासमवेत बैठक, मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसमवेत बैठक, या सर्व बैठका रत्नागिरीत होतील, तर दि. २० रोजी दापोली, मंडणगड तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा कोकण कृषी विद्यापीठाच्या सभागृहात घेणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:14 AM 18-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here