नारळ बागांना मदतीसाठी केंद्राकडून विशेष समिती

कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने नारळ बागांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन मदत करण्यासाठी एक विशेष समिती गठीत केली आहे. या समितीला ३० जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे विनंती केली होती. त्यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतील, तर आयसीएआर-सीपीसीआरआय, केरळचे प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रकल्प संयोजक या समितीचे सदस्य असतील. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी, महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन विभागाचे संचालकही या समितीत सदस्य म्हणून असतील. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचे मुख्य नारळ विकास अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतील. फळबाग आयुक्त डॉ. बी. एन. एस. मूर्ती यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. या समितीचे गठन झाल्यामुळे नारळ उत्पादकांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:46 AM 18-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here