रत्नागिरी :
रत्नागिरीतील walkers ग्रुप कडून स्वतंत्रता दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी स्टेडियम वर क्रिकेट चा सराव करणारा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि walk साठी येणारे नागरिक यावेळी सहभागी झाले होते.
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दररोज सकाळी चालण्यासाठी आणि खेळाचा सराव करण्यासाठी अनेकजण हजेरी लावतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमात स्टेडियम वर चालण्यासाठी येणारे नागरिक आणि खेळाडू हजेरी लावतात. 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिन साजरा करण्याचा निर्णय स्टेडियम वर चालण्यासाठी आणि खेळाच्या सरावासाठी येणाऱ्या नागरिकांनी घेतला आणि गुरुवारी सर्वांनी एकत्र येत स्वतंत्रता दिन उत्साहात साजरा केला.
