औरंगाबाद – अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटून शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असणाऱया बहिण भावाला चिरडल्या घटना घडली आहे. या अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला असून बहिण गंभीर जखमी आहे. आज सकाळी साडेसहा वाजता झलटागावमधील जालना बीड बायपास येथे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय-६) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तर, श्रावणी ज्ञानेश्वर शिंदे (वय – 9 वर्ष) असे जखमी झालेल्या बहिणीचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
