गुहागर समुद्रकिनारी पुन्हा सापडली चरसची ३१ पाकिटे

0

गुहागर : दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर अमली पदार्थ जप्त केल्याची घटना घडत असताना आता गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर निळ्या रंगाची चरसची पाकिटे मिळून येत आहेत. गेल्या चार दिवसांत चरसची पाकिटे मिळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारी दुपारच्या दरम्यान गुहागर शहरातील वरचा पाट बाग परिसर, असगोली समुद्रकिनारा आदी भागातून तब्बल ३१ पाकिटे मिळून आली आहेत.

तालुक्यातील गुहागर, वेलदूर, अंजनवेल, असगोली, पालशेत, अडूर कोंडकारूळ, वेळणेश्वर, बोऱ्या, तवसाळ दाभोळखाडी आदी ठिकाणी गुहागर पोलिसांनी गस्त सुरू ठेवली आहे. तर दुसऱ्या बाजूला कस्टम विभागही या किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, अशा प्रकारची पाकिटे मिळून आल्यास जनतेने तातडीने गुहागर पोलिस ठाण्यामध्ये अथवा त्या गावातील पोलिस पाटील यांच्याजवळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कस्टमकडून २० किलो ७०० ग्रॅम चरस जप्त
गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाने २० किलो ७०० ग्रॅम चरस जप्त केले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत गुहागर समुद्रकिनारी पुन्हा चरसची ३१ पाकिटे मिळून आल्याने पोलिसांनी परिसरात आपला पहारा कडक केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 25/Aug/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here