रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे जांभूळफाटा येथे बुधवार, २३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वा. सुमारास वाढदिवसाचा बॅनर काढल्याच्या रागातून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजोळे गावातील पाटीलवाडी येथील तरुणांनी मुख्य रस्त्यावर वाढदिवाचा बॅनर लावला होता. मंगळवारी सायंकाळी तो बॅनर माजी सरपंच संदीप नाचणकर यांनी काढला. त्यावरून या वादाला सुरुवात होऊन चर्चेनंतर वाद मिटला होता. परंतु बुधवारी रात्री काही तरुणांनी संदीप नाचणकर यांना जांभूळफाटा येथे बोलावले. संदीप नाचणकर हे भावासह तेथे गेले असता बॅनर काढण्याच्या रागातून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा पाटीलवाडीतून आलेल्या जमावापैकी एकाने संदीप सुमारास नाचणकरच्या डोक्यात चॉपरने वार करत त्यांच्या भावालाही बेदम मारहाण केली. स्थानिकांनी दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
बुधवारी रात्री संदीप नाचणकर (यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नदीप पाटील, अभी पाटील, वैभव पाटील, हर्मराज पाटील व इतर ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत परस्पर विरोधी तक्रार देताना हराज पाटीलने दिलेल्या तक्रारीनुसार, संदीप नाचणकर, योगेश भोसले, भाया कदम, नाना नाचणकर, प्रणय पावसकर व इतर दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 25/Aug/2023
