अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

0

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना जॉर्जिया राज्यात अटक झाली. 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक (Election Racketeering Charge) असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

अटक झाल्यावर जेलमध्ये ट्रम्प यांचा कैद्यासारखा फोटो (Criminal Mugshot) देखील काढण्यात आला. मात्र वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले.

गेल्या पाच महिन्यामध्ये ही चौथी क्रिमिनल केस आहे ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले आणि गुन्हेगार म्हणून न्यायालयात हजर व्हावं लागलं आहे. कोर्टाने ट्रम्प यांना 25 ऑगस्टपर्यंत शरणागतीची मुदत दिली होती. डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी फुल्टन काउंटी तुरुंगात आले आणि त्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करल्यानंतर 20 मिनिटांसाठी ते जेलमध्ये होते. या दरम्यान त्यांचा मग शॉट (Criminal Mugshot) म्हणजे कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हा फोटो देखील शेअर केला आहे.हर्ट्सफील्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रम्प यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत दोषी नसल्याचं सांगितलं.

वॉश्गिंटन पोस्टच्या वृत्तानंतर मोठी खळबळ

2020 च्या निवडणुकीत जॉर्जिया राज्यातील मते आपल्य बाजूने वळवण्यसाठी तेथील अधिकाऱ्याला फोन केला होता. त्या फोन कॉलचा पहिला रिपोर्ट वॉश्गिंटन पोस्ट या स्थानिक वृत्तपत्राने प्रसिद्ध केला त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प अडचणीत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आली आहे.

ट्रम्प आगामी निवडणूक लढवण्याच्या तयारीत

डोनाल्ड ट्रम्प यांची ही पहिली ही केस नसून या अगोदर देखील अनेक केसमध्ये त्यांच्यावर आरोप आहेत असे तसेच काही प्रकरणांमध्ये त्यांनी शरणागती पत्करली आहे. असे असताना देखील 2024 ला अमेरीकेत राष्ट्रध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लढवण्याच्या ते तयारीत आहे. आगामी निवडणुकीसाठी त्यांची तयारी देखील सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 25-08-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here