सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.शाळा, महाविद्यालये,शासकीय कार्यालये येथे ध्वजारोहण करण्यात आले.आम.नितेश राणे यांनी खारेपाटण पुरपरिस्थितीत बचाव कार्यासाठी बोलावलेल्या धाडसी आपतकालीन व्यवस्थापनेचे कार्य करणा-यांना सन्मानपूर्वक प्रमाण पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
खारेपाटण येथे पू्रस्थितीत पाण्यात अडकलेल्या जैन वाडी येथील पवन कावळे आणि कुटूंबातील पाच सदस्य वरच्या मजल्यावर अडकून राहिले होते.त्यात ३ वर्षे व ९ वर्ष लहान मुलांचा समावेश होता.कावळे कुटुंबाला बाहेर काढणाऱ्या आपतकालीन व्यवस्थापनेचे कार्य करणा-यांचा प्रांत श्रीमती रजपूत यांच्या हस्ते,तसेच तहसीलदार आर.जे.पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, सभापती सुजाता हल्दीवे, उपसभापती सौ.दळवी यांच्या हस्ते,आपतकालीन व्यवस्थापनेचे कार्य करणारे राजापूर तालूक्यातील जैतापूर येथील सामाजिक कार्यकार्ते पत्रकार सचिन नारकर,पंगेरे येथील सामाजिक कार्यकार्ते शिरीष पंगेरकर, किशोर पंगेरकर,आशिष पाटील,कालिदास पंगेरकर,नितीश कांबळी,श्रेयस पडवळ,अक्षय पंगेरकर,कणकवलीचे मत्तलवार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.आम.नितेश राणे यांनी पूर ग्रस्थांच्या मदती साठी या आपतकालीन व्यवस्थापनेला खरेपटण येथे बोलाविले होते.सामाजिक कार्याचेभान राखत त्यांनी पुराच्या पाण्यातुन बोटीच्या सहाय्याने नागरिकांना सुखरूप बाहेर काढले होते.या कामी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.कणकलीतील तहसिलदार आर.जे.पवार.यांनी नियोजन बद्ध कार्य केल्याने कणकवलीत त्यांचे कौतुक केले जात आहे.
