महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स तर्फे जून महिन्यात घेण्यात आलेल्या endodontics या विषयातील मास्टर इन डेन्टिस्ट्री(MDS) ह्या पदव्युत्तर परीक्षेत रत्नागिरीचा डॉ. क्षितिज जोशी हा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला असून त्याने मिळवलेल्या या नेत्रदिपक यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ.क्षितिज हा रत्नागिरी येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.समीर व डॉ.(सौ)रत्ना जोशी यांचा सुपुत्र तसेच रत्नागिरीतील जुने आणि नामांकित दंतवैद्यक डॉ.चंद्रशेखर जोशी यांचा पुतण्या असून, या यशामध्ये त्यांचा व तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयामधील डॉ.चेतन होटकर सर यांचा मोलाचा वाटा आहे. दात वाचवणे व दात भरणे (root canal) ह्या विषयात त्याने पदवी मिळविल्यानंतर लवकरच रत्नागिरी येथे प्रॅक्टिस सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.
