जिल्ह्याला 154 कोटींची मदत; ना. उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांकरिता 360 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यापैकी 154 कोटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी असणार आहे. ना. सामंत म्हणाले कि, चक्रीवादळात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचे नुकसान झालेले आहे, यामुळे कोकण आयुक्त यांनी शासनाकडे 360 कोटी रुपये निधीची मागणी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री यांच्यासमवेत आपल्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे. जे कुटुंब या चक्रीवादळात बाधित आहेत त्यांच्या बँक खात्यामार्फत ही मदत पोहोच केली जाणार आहे. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, की रत्नागिरी जिल्ह्यात 93 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. शिवाय मदतीचे वाटप देखील सुरू आहे. जिल्ह्यामध्ये 794 गावे बाधित झालेली आहेत मात्र जीवित हानी झालेली नाही जिल्ह्यामध्ये 1770 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून 41 हजार 306 अंशतः बाधित झालेली आहे यात मंडणगड मध्ये 600, दापोलीमध्ये 896, गुहागरमध्ये 4, रत्नागिरी तालुक्यात अकरा व इतर ठिकाणी देखील घरांची पूर्णपणे हानी झालेली आहे. तर अंशतः नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये मंडणगड मध्ये 14000 दापोली मध्ये 22000 गुहागर मध्ये 1745 रत्नागिरी तालुक्यामध्ये 1120 व इतर तालुक्यांमध्ये देखील घरांचे अंशतः नुकसान झालेले आहे तर जिल्ह्यांमध्ये 1871 गोठे 756 दुकाने बाधित झाली असून 94 जनावरे दगावली आहेत आतापर्यंत 8 कोटी 9 लाख मदतीचे वाटप करण्यात आलेली आहे यापैकी बँकेच्या खात्यात 7 कोटी 88 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत. राज्य शासन हे चक्रीवादळ त्यांच्या पाठीशी उभे आहे हे मुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजूर करून सिद्ध केलेले आहे. केंद्राने देखील राज्य शासनाने प्रमाणे चक्रीवादळ ग्रस्तांच्या पाठीशी उभे राहावे व कोकणाला अधिकाधिक भरीव मदत करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:00 AM 19-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here