शिवसेना पक्षाचा आज 54वा वर्धापन दिन; गरजूंना मदतीचं कार्य सुरुच ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा आज 54 वा वर्धापन दिन आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्यामुळे, दरवर्षीप्रमाणे या वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामुहिकरित्या साजरा होणार नाही. त्या ऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत. शिवसेना शाखेत आधीपासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. तसंच इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:27 AM 19-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here