ब्रेकिंग : संघ कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून केंद्रीय पथक पुन्हा एकदा दापोलीत

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक काही दिवसांपूर्वी दापोलीत आले होते. मात्र या पथकाने वरवर पहाणी करून थेट महाड गाठले होते. यावर कोकणी जनतेने नाराजी व्यक्त केली होती. “केंद्रीय पथकाच्या इतर सदस्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. पण त्यांचे चेअरमन मात्र अत्यंत बिझी होते. दापोलीत त्यांना नेटवर्क मिळत नसल्यानं ते कावरेबावरे झाले होते. शिवाय, डोक्यावर गरम पाणी नसेल, तर डोकं थंड होणार नाही असं सांगत त्यांनी थेट महाड गाठलं,” अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. यानंतर संघाच्या एका कार्यकर्त्याने थेट पंतप्रधान कार्यालाकडे या केंद्रीय पथकाची तक्रार केली होती. या सर्व तक्रारींची दखल घेत या पथकातील सदस्यांना चांगलेच खडसावल्याचे बोलले जात आहे. आज हे पथक पुन्हा दापोलीत आले असून वादळग्रस्त भागाची पहाणी करताना दिसत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:36 PM 19-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here