मासेमारी परवाना नूतनीकरणासाठी मुदतवाढ

रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळावा यासाठी सागरी मासेमारी क्षेत्रातील यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांचा मासेमारी परवाना टाळेबंदीच्या काळात संपला असल्यास नूतनीकरणासाठी दिनांकापासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लॉकडाऊन काळात कोकणातील मासेमारी ठप्प झाली होती. त्यानंतरही ठेका पद्धतीने खासगी तलावात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली होती. या काळात मासेमारी व्यवसायाचा परवाना संपला असल्यास त्याच्या नूतनीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ १ एप्रिलपासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. ३० जून २०१७ व ३ जुलै २०१९ या दोन शासन निर्णयांनुसार मासेमारीसाठी ठेक्याने दिलेल्या तलावांची चालू वर्षाची तलाव ठेका मिळविण्यासाठी १० टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठी, मत्स्यबीज केंद्राची लॉकडाऊन कालावधीत येणारी चालू वर्षाची भाडेपट्टीची रक्कम भरणे यासाठी मुदतवाढ आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:13 PM 20-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here