इसापूर मार्गावर साडेसात लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

0

चौकुय्-इसापूर-हेरे मार्गावर सुमारे साडेसात लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारू सह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

विश्वनाथ आनंदा रायकर (वय ३०, रा. शिप्पूर तर्फ आजरा, पेंढारवाडी रोड, ता. गडहिंग्लज) व संभाजी शिवाजी साबळे (३०, रा. साबळे गल्ली ता. चंदगड) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी रायकर व साबळे यांना चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडीत सुनावली. 

काल, सोमवारी (दि.२२) रात्री, जिल्हा भरारी पथकास चौकुळ-इसापूर-हेरे (ता. चंदगड) या मार्गावरून काहीजण बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने या मार्गावर पाळत ठेवली असता आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास महिंद्रा पिकअप हे वाहन येत असल्याचे निर्दशनास आले. या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने न थांबवता तेरवण गावच्या दिशेने भरधाव वेगाने पलायन केले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला. मात्र किल्ले पारगडकडे जाणार्‍या फाट्यावर दुसर्‍या भरारी पथकाने या वाहनास ताब्यात घेतले. यावेळी वाहनातील सतिश आर्दाळकर (रा. अडकूर) आणि सुभाष मुसळे (रा. अडकूर) हे दोघेजण अंधाराचा व पावसाचा फायदा घेत फरारी झाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here