‘त्या’ कोरोनाबाधितांना आश्रय दिल्याने हॉटेल व्यावसायिकांसहित नाभिकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : कोरोनाची तपासणी झालेली असताना देखील प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिक आणि त्यांचे केस कापणाऱ्या एका नाभिकावर जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयगड येथील एका पोर्टवर दोन जहाजे दुरुस्ती कामानिमित्त दाखल झाली होती. यानंतर यातील कामगार बाजारपेठेत देखील फिरले. येथील एका केश कर्तनालयात जाऊन केस कापले. या जहाजवरील 13 जणांची रत्नागिरीत कोव्हिड चाचणी करण्यात आली. मात्र या 13 जणांपैकी काहींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कामगारांची माहिती प्रशासनाला न दिल्याने संबधित 3 हॉटेल व्यावसायिक आणि एका नाभिक या चौघांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या कलमानुसार साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलमानुसार जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:57 AM 22-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here