शुल्लक कारणावरून तरुणाच्या डोक्यात घातला भितळा

रत्नागिरी : शुल्लक कारणावरून तरुणाला लाकडी भितळा डोक्यात मारून दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय चव्हाण असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी दि. २० रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास देवरुख नदीपलीकडे चव्हाणवाडी येथे घडली. प्रकाश लाल्या साबळे (वय ३४, रा. बागवाडी देवरूख, ता. संगमेश्वर) व संशयित हे एकाच ठिकाणी कामावर जाणार होते. चव्हाण याने मी कामावर डबा घेऊन आलो आहे. तू पण कामावर चल, असे साबळे यांना सांगितले. साबळे यांनी ‘तू कामावर जा, मी येत नाही’ असे सांगितले. याचा राग येऊन संशयित चव्हाण याने साबळे यांच्या डोक्यात लाकडी भितळा मारुन दुखापत केली. या प्रकरणी साबळे यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:34 PM 22-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here