राजापूर : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आजही अनेक त्रुटी आहेत. राजापूर एसटीडेपोसमोर सुरक्षिततेच्या योग्य उपाययोजना कराव्यात अशी वारंवार मागणी करूनही संबधित यंत्रणेने त्याकडे लक्ष दिलेले नाही.
मात्र आता गणेशोत्सव काळात होणारी गर्दी, वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी हायमास्क लावून पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी व वाहतुक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी केली. याबाबत आपण जुलै मध्ये महामार्ग खारेपाटण विभागाला पत्र दिलेले असून सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या गंभीर विषयाची त्यांना माहिती देणार असल्याचेही अॅड. जमिर खलिफे यांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आजही अनेक त्रुटी आहेत. राजापूर एसटीडेपोसमोर सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करावी अशी मागणी आहे. भुयारी मार्ग की सर्कल या वादात याकडे प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्याचा फटका आता राजापुरकरांना बसत आहे.
राजापूर एसटीडेपोसमोर सुरक्षिततेच्या प्रवाशी, वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना प्रशासनाने केलेली नाही. या ठिकाणी योग्य प्रकारे दिशादर्शक फलक लावणे, ब्लींकर्स बसविणे, गतीरोधक टाकणे, वाहतुक दीशादर्शक फलक लावणे यांसारख्या बाबी करणे आवश्यक आहे. तर रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी यासाठी या ठिकाणी हायमास्क बसवावा अशीही आपण मागणी केली होती. मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
आता गणेशोत्सव काळात राजापूर एसटीडेपोसमोर मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी होते, प्रवाशी उतरतात, खासगी गाडया थांबतात त्यामुळे या अनेक गैरसोयींमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने गणेशोत्सव सणापुर्वी या ठिकाणी हायमास्क बसवावा अशी मागणी अॅड. खलिफे यांनी केली आहे. तर चारही बाजुने कशाही प्रकारे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना पायबंद बसावा यासाठी गतीरोधक बसवून योग्य पट्टे मारावेत, रात्रीच्या वेळी रस्ता लक्षात यावा यासाठी रेड ब्लींकर्स बसवावेत अशी मागणी अॅड. जमिर खलिफे यांनी केली आहे.
याबाबत आपण सोमवारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचीही भेट घेऊन त्यांना याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी करणार असल्याचेही अॅड. जमिर खलिफे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 12/Sep/2023
