देवरूख : येथील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे न्या. तात्यासाहेब आठल्ये कला, वेद. शं. रा. सप्रे वाणिज्य आणि विधिज्ञ दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालयात दि. १३ रोजी अंधांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘चला डोळस होऊ या अंधांसाठी मराठीतील पहिले ब्रेल पाक्षिक ‘स्पर्शज्ञान’चे संपादक, अंध कलाकारांच्या विश्वविक्रमी नाटकांचे दिग्दर्शक, ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ स्वागत थोरात यांचा प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहे. सकाळी १०.३० वाजता कै. काकासाहेब पंडीत शैक्षणिक संकुलाच्या परिसंवाद कक्षामध्ये होणार आहे चला डोळस होऊ या अंधांसाठी मराठीतील पहिले ब्रेल पाक्षिक ‘स्पर्शज्ञान’चे संपादक, अंध कलाकारांच्या विश्वविक्रमी नाटकांचे दिग्दर्शक, ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ स्वागत थोरात यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, सहसंयोजक उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील हे काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. सुनील सोनावणे, श्री. अनिकेत ढावरे, डॉ. प्रशांत नारगुडे, सौ. प्रिया मोरे, रेवा कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 12/Sep/2023
