चिपळूण : शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटी व कोकण भूमी कृषी पर्यटन संस्था कोकण प्रांत यांच्या विद्यमाने रानभाज्या व स्थानिक भाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत होणार आहे. यावेळी प्रदर्शन, विक्री व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कूल येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. पाककला स्पर्धा अंतर्गत रानभाज्यांपासून तयार केलेली रेसिपी (तिखट), स्थानिक भाज्यांपासून तयार केलेली रेसिपी (तिखट), स्थानिक व रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले गोड पदार्थ अशी स्पर्धा होणार असून, या सर्व पदार्थांमध्ये शाकाहाराचा समावेश असेल. तसेच यापासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी सुविधा असणार आहे. यामध्ये कंदमुळे, खोड, पान, फुल, फळे, देठ, बी, अंकूर यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 12/Sep/2023
