लांजा : उपळे वीरगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गणपत कुर्तडकर यांची सलग सहाव्यांदा बिनविरोध निवड

0

लांजा : तालुक्यातील उपळे विरगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गणपत कुर्तडकर यांची सलग सहाव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उपळे विरगाव ग्रामपंचायत ची ग्रामसभा नुकतीच पार पडली.

या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि समाजसेवक म्हणून परिचित असलेले गणपत कुर्तडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गणपत तानू कुर्तडकर हे अनेक सामाजिक संस्थांशी कार्यरत आहेत. विविध सामाजिक, सहकार, शैक्षणिक संस्थांवर ते कार्यरत आहेत .तसेच काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. तळागाळातील सर्वसामान्यांच्या, जनतेच्या विविध समस्या सोडवण्यात कार्यतत्पर असतात.

दरम्यान तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा गणपत कुर्तडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे गावच्या सरपंच वैदेही वीर ,उपसरपंच आत्माराम धुमक, माजी उपसभापती लक्ष्मण मोर्ये, तसेच माजी सरपंच राजा वीर, विनायक भागवत, यासह अन्य ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here