गणपती कारखाना चित्रशाळेस कापरे देऊळवाडा विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

0

चिपळूण : तालुक्यातील कापरे येथे गेली ४० वर्षे कार्यरत असणारे गणपती कारखाना चित्रशाळेस जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा देऊळवाडा शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी क्षेत्रभेट दिली.

शैक्षणिक क्षेत्रातील निवृत्त केंद्रप्रमुख तथा प्रवचनकार तुकाराम गुरव आणि प्रसिद्ध गणपती कार्यशाळेचे चित्रकार मंगेश बाळू लाखण यांचे कापरे गावात स्वतंत्र गणपती कारखाने आहेत. शाडूमातीची मूर्ती इकोफ्रेंडली पर्यावरणास लाभधारक आहे. गणपती मूर्ती साकारताना प्रत्येक चित्रकाराला आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना ज्येष्ठ चित्रकार तुकाराम गुरव यांनी व्यक्त केली. तरुण हौशी चित्रकार मंगेश लाखण यांनी पारंपरिक व्यवसायाची माहिती देऊन अवघ्या काही मिनिटांत गणपतीचे वाहन उंदीर मामा शाडूमाती पासून प्रात्यक्षिक कृती करून दाखवले. या चित्रशाळेत सहभागी असणारे सर्व विद्यार्थी, विजय गुरव, अजित कळमुंडकर, संतोष बांद्रे, सतिश गायकवाड, सनित बांद्रे, धिरज खेराडे आदींचे उत्तम सहकार्य मिळाले. मुख्याध्यापिका आश्विनी नाखरेकर, पदवीधर शिक्षिका मानसी महाडीक, संतोष तांबे आणि गणेश सुर्वे आदींनी क्षेत्रभेटीचे उत्तम नियोजन केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here