जैतापूर : अनंत श्रीविभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज, पिठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता नाटे नगर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नाटे पटांगणावर पादुका दर्शन सोहळा ध्वजारोहण व मंडप भुमी पूजन सोहळा संपन्न झाला.
ग्रामपंचायत नाटे चे विद्यमान सरपंच श्री. संदिप बांदकर यांच्या हस्ते मंडप भूमिपूजन व ध्वजारोहण करण्यात आले… यावेळी नाटे पंचक्रोशीतील श्री. संतोष चव्हाण, श्री. रविकांत कुबडे, श्री. रमेश लांजेकर, श्री. संदेश पाथरे, श्री. राजेश चव्हाण, सौ. रचना खांबल, सौ. श्रुतिका बांदकर, पत्रकार श्री. राजन लाड उपस्थित होते.
मुख्य पीठ BIN प्रमुख श्री. गणेश दुर्गवली, जिल्हा निरीक्षक श्री. संदिप नार्वेकर, जिल्हा सेवाध्यक्ष श्री. बाळकृष्ण चव्हाण, कोकण पीठ ब्रिगेडीयर विकास श्री. राजेंद्र खांबल, पादुका दर्शन सोहळा प्रमुख श्री. नारायण गावकर, जिल्हा अध्यात्मिक प्रमुख सौ. सिद्धी दुर्गवली, जि. प्रसिद्धी प्रमुख श्री. राजेश गुळेकर, जि. सामाजिक प्रमुख सौ. अनिता जाधव, जिल्हा सचिव श्री. परशुराम जाधव, विशेष कार्यवाहक राजापूर – दयानंद बाणे, संगमेश्वर श्री. सागवेकर, तसेच राजापूर तालुक्यातील तालुका पदाधिकारी, सेवाकेंद्र पदाधिकारी, भक्तगण उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:46 PM 12/Sep/2023
