उद्योग मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन जालना आंतरवली सराटी गावाकडे तात्काळ रवाना…

0

उद्योग मंत्री उदय सामंत आज जळगावात “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सहभागी होणार होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना विशेष संदेश देऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालनासाठी रवाना होत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जालना आंदोलनस्थळी उपस्थित असलेले शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे आणि नेते अर्जून खोतकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here