रत्नागिरी : हरतालिका पूजनकरिता जाहीर करण्यात आलेली सोमवारची (ता. १८) स्थानिक सुटी रद्द करण्यात आली आहे. सुधारित १३ नोव्हेंबर २०२३ ला सोमवती अमावस्यानिमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबतची अधिसूचना जाहीर केली. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी २०२३ या वर्षासाठी जिल्हा महसूल हद्दीसाठी २८ फेब्रुवारी व ८ सप्टेंबरला अधिसूचना लागू करुन स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले होते. २८ फेब्रुवारी २०२३ च्या अधिसूचनेमधील नमूद केलेली १८ सप्टेंबरला हरतालिका पूजन करिता जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करण्यात येत असून सुधारित १३ नोव्हेंबरला सोमवती अमावस्यानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 12/Sep/2023
