लोकसभा निवडणुकीत रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या आणि प्रचार दुसऱ्याचा केला; नवनीत राणा यांचे गंभीर आरोप

0

अमरावती : अनेक लोक आता जनसंवाद यात्रा करत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की, 33 महिन्यांचं तुमचं सरकार होतं. तेव्हा कुठं तुमची यात्रा होती सत्ता गेली म्हणून तुम्हाला आता जनसंवाद यात्रा आठवते.

तुम्ही लोकांना नौटंकी म्हणतात तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात नौटंकी करणं तुम्हीच सोडा. महिलांचं नाव घेऊन मी उभी राहिली महिलांचा अपमान करण्यासाठी नाही. नांदगाव पेठ मध्ये किती तरुणांना तुम्ही रोजगार दिला. फोन करून लोकांना सांगतात दहीहंडी ला जाऊ नका. मी तुमच्या नेत्या समोर झुकणार नाही.जनतेसमोर झुकेल.लोकसभा निवडणुकीत रवी राणा कडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे अश्रू काढण्याचं तुम्ही काम केलं आणि प्रचार दुसऱ्याचा केला, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांची नाव न घेता माजी मंत्री, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.

मी नेत्यासमोर झुकण्यासाठी राजकारणात आले नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं मंत्रिपद देऊ नका. तेव्हा त्यांनी हॉर्मोस कंपनी दिली. तुम्हाला दुसऱ्यादा मंत्री पद मिळणार नाही याची स्वाक्षरी नाही. मला जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा का तुम्ही बोलल्या नाहीत. कारण तुम्हाला मंत्रिपद गमावण्याची भीती होती. तुम्हाला आयतं सोन्याचं ताट भेटले आम्ही रक्ताचं पाणी केलं. राहुल गांधीच्या इमानदारी बदल बोलू नका. लोकसभा निवडणुकीत तुम्ही रवी राणा कडून पैसे घेतले आणि दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केला, असं म्हणत नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर घणाघात केलाय.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात आज काँग्रेसची जनसंवाद यात्रा काढली. गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगावमधून या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. त्यावर टीका नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केली आहे.

आमदार रवी राणा यांनीही यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. मी जेलमध्ये होतो. यशोमती ठाकूर जेलरला फोन करून सांगायच्या की रवी राणाला सतरंजी देऊ नये. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्या यादीत यशोमती ठाकुर यांच नाव होतं.मंत्रिपद मिळाल नाही म्हणून यशोमती ठाकूर भाजपमध्ये गेल्या नाहीत, असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केवा आहे. जनसंवाद यात्रा केल्या पेक्षा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जा. जनसंवाद यात्रा ही नौटंकी आहे. रवी राणा किराणा वाटतो. तर तुम्ही साखर तरी वाटा. काही लोकांनी माझ्या गाडीवर हमला केला चाकू काढला. पण जनता माझ्यासोबत आहे. म्हणून रवी राणांच्या केसालाही धक्का लागत नाही, असं रवी राणा म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:20 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here