खेड : नातूवाडी धरणाच्या गोडावूनमध्ये लाखोंची चोरी

0

खेड : तालुक्यामध्ये चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच असून रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी एकच दिवशी दोन विविध ठिकाणी झालेल्या चोरी व घरफोडीमध्ये रोख रक्कम व लाखोंच्या किमतीच्या साहित्यांची चोरी झाली आहे. त्यामध्ये खेडमधील नातूवाडी धरणाशेजारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या गोडावूनमधून अज्ञात चोरटयांनी तब्बल १ लाख २९ हजार ३०० रुपये किमतीचे धरणाचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत खेड पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात भादंवि कलम ३८०, ४५४ आहे. ४५७ नुसार सोमवारी ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नातूवाडी धरणाच्या शेजारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या गोडावूनमध्ये चोरी झाल्यानंतर त्याच दिवशी रविवार १० सप्टेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गावर पटवर्धन लोटे या ठिकाणी एका किराणा मालाच्या दुकानात जिन्नस खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या हातातील पैसे ठेवलेली पिशवी एका चोरट्याने हिसकावून पळवली. त्या पिशवीमध्ये १२ हजार रुपये रोख रक्कम होती .

याबाबत त्या व्यक्तीने तत्काळ खेड पोलिसांना संपर्क करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी त्या अज्ञात चोरट्यावर भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला

खेड तालुक्यात एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी झालेल्या चोच्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 13/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here