रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील डॉ. भोळे हॉस्पिटल येथे बुधवारी दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत कॅल्शिअम तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हाडातील कॅल्शिअमची तपासणी अत्याधुनिक मशीनद्वारे करण्यात येणार आहे.
तसेच हाडाच्या विविध व्याधींवर मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरातील तपासणीच्या रिपोर्टनुसार अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. जितेंद्र भोले (एम. एस. ओर्थिवेडियस) पुढील मार्गदर्शन करणार आहेत.
दीर्घकाळपर्यंत पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी असणाऱ्या गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी भोळे हॉस्पिटल रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन भोळे हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 13-09-2023
