लांजा : साटवली येथे गावठी दारूधंद्यावर छापा

0

लांजा : गावठी दारू धंद्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली. असून सोमवारी ११ सप्टेंबर रोजी तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत गावठी आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा अस एकूण २ हजार ३४९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती लांजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास साटवली भंडारवाडी येथील लियाकत काझी यांच्या बंद घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडी झुडपामध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी नितीन शांताराम तरळ (३४ वर्षे, रा. गांगोबाडी साटवली) व अनोळखी इसम असे आढळून आले. यावेळी नितीन तरळ याच्या ताब्यात पन्नास रुपये किमतीची एक लिटरची तीन छोट्या पारदर्शक पिशवीमध्ये बांधलेली गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. त्याचप्रमाणे या ठिकाणी बेवारस स्थितीत ५२६ रुपये किमतीच्या हनी ब्लेड ब्रांडीच्या प्लास्टिक बॉटल २० बाटल्या, २८९ रुपये किमतीचे लेमन व्होडखा ११ वाटल्या, ३६८ रुपये किंमतीचे हायवई फाईन व्हिस्की १४ वाटल्या. ४८० रुपये किंमतीच्या रोमानिया व्होडका १८० मिली मापाच्या तीन बाटल्या, २२५ रुपये किमतीच्या मॅकडॉल नंबर एक अशा ३ बाटल्या, २२० रुपये किंमतीच्या डॉक्टर बँडी २ बाटल्या, २४० रुपये किंमतीच्या रॉयल चॅलेंज विस्की २ बाटल्या असा एकूण २ हजार ३४९ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला लांजा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या नितीन तरळ व अन्य एकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास पोलिस हेड. कॉ. तेजस मोरे हे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
10:50 AM 13/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here