पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी १४ सप्टेंबरपर्यंत मुदत

0

रत्नागिरी : दहावी आणि बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑप डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १४ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठीची अंतिम मुदत आणि अन्य सूचना परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या. प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीभूत (कॅप) व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाईन नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत सुरू ठेवल्या जातील. संस्था स्तरावरील कोट्यात किंवा केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी ई छाननी पद्धत किंवा प्रत्यक्ष छाननी पद्धत याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, झाल्यास अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे.

संबंधित उमेदवारांनी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. त्या उमेदवारांची गुणवत्तायादी संस्था स्तरावर तयार केली जाईल. संस्थांनी १४ सप्टेंबपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती संस्थांना १५ सप्टेंबरला ऑनलाईन भरावी लागणार आहे. मात्र, या तारखा अस्थायी स्वरूपाच्या आहेत. काही अपरिहार्य परिस्थितीत बद सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
11:04 AM 13/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here