रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर (एस अँड टी डिपार्टमेंट सीपीएम-३) या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सोमवार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी चिरायु हॉस्पिटलमध्ये आकस्मिक मृत्यू झाला.
याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीपत शंकर गुरव (५३, रा. पाडावेवाडी मिरजोळे, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सोमवारी ते कामावर गेलेले असताना त्यांना अशक्तपणा आल्याने त्यांनी त्याबाबत रेल्वेच्या डॉक्टरांना कळवले. आपले काम आटोपल्यावर उपचार घेण्यासाठी ते सायंकाळी ४ वा. दुरांतो एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आले. तिथे रेल्वे डॉक्टरांकडून उपचार घेतल्यावर अधिक उपचारासाठी रेल्वेस्टाफने त्यांना चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 13-09-2023
