रत्नागिरी : खरीप हंगाम २०२३ ची ई-पीक पाहणी नोंदणी करण्याच्या सूचना प्रसासनाने केल्या आहेत. २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोकणातील अनेक शेतकरी अद्याप ई-पीक पाहणी नोंदणी उपक्रमापासून वंचित आहे. अनेक शेतकरी या योजनेत प्रलंबित आहेत. मोबाईल अॅपद्वारे पिकाची नोंदणी करण्याचे प्रमाणही रत्नागिरी जिल्ह्यात कमी आहे. नेटच्या आणि स्मार्ट फोन नसण्याच्या तांत्रिक समस्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपासून दूर आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देताना येणाऱ्या अडचणीमुळे पीक पाहण्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
11:10 AM 13/Sep/2023
