चिपळूण : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात १७ वर्षानंतर पुन्हा रंगला शक्तीतुराचा सामना..

0

चिपळूण : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये गेल्या १७ वर्षानंतर पुन्हा एकदा शक्ती- तुऱ्याचा नाद घुमला.

शक्तीवाले शाहीर दीपक कांबळीसह परशुराम फागे आणि तुरेवाले शाहीर रत्नाकर महाकाळ यांनी सतरा वर्षानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये शक्ती तुरा सामन्यांची रात्र रसिकांच्या साथीने गाजवली.

पुरोगामी कलगीतुरा उन्नती मंडळ चिपळूण यांच्यावतीने नव्याने सुरू झालेला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये प्रथमच शक्ती तुरा सामन्याचे आयोजन केले होते. सोमवार ११ रोजी रात्री १० वाजता या सामन्यांना सुरुवात झाली. तत्पूर्वी चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन ठसाळे, माजी नगरसेवक करामत मिठागरी आणि पुरोगामी कलगी तुरा उन्नती मंडळाचे अध्यक्ष महादेव नाचरे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत कार्यक्रमाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शक्ती वाल्यांची प्रथम फेरी सुरू झाली. या फेरीमध्ये शाहीर दीपक कांबळी यांनी सुंदर गण, गवळण व पद सादर केले. मुलांनी सुध्दा बहारदार नृत्य सादर केले. शाहीर परशुराम फागे यांनी आपल्या शैलीतून रसिकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुरेवाले शाहीर रत्नाकर महाकाळ यांना डबल मिनींगचा बादशहा म्हणून ओळखले जाते. त्यांची प्रथम फेरी सुरू झाली आणि रसिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून स्वागत केले. शाहीर रत्नाकर महाकाळ यांनी नवीन युवा पिढीला आवडणाऱ्या गीतांचा नजराणा सादर केला. प्रसिद्ध शक्तिवाल्या शाहीर सौ तेजल पवार यांनी खास मुंबईहून येत कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

या सामन्यासाठी खास मंडळाचे अध्यक्ष महादेव नाचरे, राजेंद्र पवार, सुरेश बहुतुले, रघुनाथ मेस्त्री, सुरेश गोलमडे, विजय भोजने, दीपक कांबळी या सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. नवीन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मध्ये शांत आणि संयम दाखवत या लोककलेचा आस्वाद घेतला. लोककला जपण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी रसिकांची साथच महत्वाची आहे. आयोजकांनी सुध्दा सर्व रसिकांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 13-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here