खेडमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा

0

खेड : माझी वसुंधरा अभियान ४.० पर्यावरणपूरक गणेशोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत येथील पालिकेने इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. माझी वसुंधरा अभियान ४० व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत येथील प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी कंबर कसलेली असतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत शहरातील मूर्तिकारांना पर्यावरणपूरक मूर्तीच सूचित केले आहेत.

या पाठोपाठ इको वापर करण्याबाबत यापूर्वीच पत्राद्वारे इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचेही आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यास २५०० रु., उपविजेत्यास १५०० रु. व तृतीय क्रमांकास १ हजार रु. तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रमाणपत्र देऊन बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
11:46 AM 13/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here