वाद्य दुरुस्तीसाठी गणेशभक्तांची लगबग

0

गुहागर : कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना वाद्यालयात कारागिरांची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली अन्य ठिकाणच्या तसेच बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गणेशोत्सवात आरती, लगबग. भजन, नाच, जाखडी, टिपरी नृत्य आदी कलाप्रकार उत्साहात साजरे केले जातात. यासाठी विविध वाद्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये ढोलकी, नाल, पखवाज, झांज, पेटी, ताशा, ढोल यांसारख्या विविध वाद्यांची गरज असते. त्यामुळे सध्या वाद्यनिर्मितीच्या आणि दुरुस्तीच्या कामांनाही वेग आल्याचे दिसून येत आहे.

आबलोली बाजारपेठेतील अनिल पालशेतकर हे पारंपरिक वाद्य दुरुस्ती करतात. या बाबत ते सांगतात की, या ठिकाणी परिसरातील सुमारे ३०-४० गावातील लोक वाद्य दुरुस्ती बनवणाऱ्या अथवा खरेदीसाठी येत असतात. गेल्या तीन पिढ्या पालशेतकर कुटुंबीय ही सेवा देत आहे. वाढत्या महागाईच्या काळातही गणेशभक्तांना माफक दरामध्ये सेवा देण्याचा आमचा प्रयत्ना असतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात नाचगाण्याला रंग भरू लागतात. टिपरीचे ताल धरू लागतात आणि वाद्याच्या ठेक्यावर गणेशोत्सवाच्या आगमनाची घराघरांतून चाहूल लागल्याचे दिसून येते. हा उत्सव अधिक आनंददायी वाद्यालयात वाद्य दुरुस्तीसाठी आणि खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
12:16 PM 13/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here